‘बदलता भारत’ : भारतीय स्वातंत्र्याची कहाणी कुठून व कशी सुरू झाली, ती कुठवर पोहोचली आणि ती अजूनही अधुरी का राहिली आहे, याचा शोध घेणारा महाग्रंथ

स्वातंत्र्याला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. जगात काही शतके सर्वाधिक वर्चस्वशाली असणाऱ्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध इथल्या कोट्यवधी जनतेने अथक संघर्ष करून मिळवलेले हे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य संग्रामाचा आणि स्वातंत्र्योत्तर देशउभारणीचा आजवरचा दोन शतकांहून अधिक असा हा काळ. अशा आपल्या इतिहासावर विविध अंगांनी बोलणाऱ्या, त्याचे अंतरंग उकलणाऱ्या आणि त्यातून भारताच्या भविष्याची दिशा दाखवणाऱ्या लेखांचा हा महासंग्रह.......

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत, म्हणजे ज्ञान-विज्ञान, औपचारिक शिक्षण, लोकशिक्षण, प्रबोधन, राजकारण या सार्‍यांमध्ये एक मूलभूत बदल आवश्यक आहे (उत्तरार्ध)

वास्तव वा सत्य काय याचे निर्णय केवळ विचार, कल्पनाप्रणाली, सिध्दांत, प्रचार, भाषा, जाणीव, यांनी करता येत नाहीत. वस्तुनिष्ठ सत्य हे केवळ बाह्य जगाची नक्कल, प्रतिबिंब वा प्रतिमा निर्माण करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर ‘सत्य’ हे माणसांनी जग व परिस्थिती आकळून, समजून घेऊन ते बदलण्याशी, त्या बदलण्यात ‘सत्य’ गवसण्याची, एवढेच नव्हे तर ते ‘निर्माण’ करण्याशी आणि त्याचे ज्ञान होण्याशी ते जोडलेले आहे.......

शंका घेणे, समीक्षा करणे आणि ‘जागे राहणे’ अटळ ठरते. आम आदमीच्या कॉमन सेन्सला व अन्य टीकेला स्थान असावे, ते जमेत घेतले जावे. करोना व रेमडेसिवीर हे केवळ निमित्त...

प्रत्यक्ष फिल्डमध्ये डॉक्टर- सेवक- सैनिक- सेनापती- कार्यकर्ते- राजकारणी- धुरीण- सामाजिक कार्यकर्ते हे सारे महत्त्वाचे असतात. त्यांच्या योग्य कार्याविषयी पूर्ण आदर हवाच. पण एकतर केवळ वैद्यकीय सेवा म्हणजे आपापत: ‘आरोग्य’नव्हे, युद्ध म्हणजे आपापत: संरक्षण वा शांतता नव्हे, समाजकार्य म्हणजे आपापत: समाज परिवर्तन नव्हे आणि राजकारण म्हणजे आपापत: लोकशाही नव्हे. त्या त्या प्रश्नाला सोडवत पण त्यापलीकडे जायला हवे.......